Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांना आधीच होती कुणकुण? त्यामुळेच जाहीर केलेली निवृत्ती, पण...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात चौथा भूंकप आज पाहायला मिळाला आहे. एरवी सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार दिग्गज नेत्यांना घेऊन भाजपमध्ये सामील झाला आहे. मात्र या बंडाची कुणकण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना आधीच होता, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्यांच्या निवृत्तीला पक्षातून मोठा विरोध झाला होता. त्यामुळे अखेर शरद पवार यांनी आपली निवृत्ती मागे घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंड थांबले वाटत होते. मात्र आज घडलेल्या बंडमुळे पक्ष फुटीला तेव्हापासूनच सुरूवात झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

किंबहुना शरद पवार यांना पक्षातील फुटीची कल्पना असावी, त्यामुळेच त्यांनी निवृत्ती जाहीर केली, असंही बोललं जात आहे. दुसरीकडे शरद पवारांचे अत्यंत निकटचे मानले जाणारे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, पुतणे अजित पवार, धनंजय मुंडे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT