Sharad Pawar speaks at PC after CM Oath taking ceremony
Sharad Pawar speaks at PC after CM Oath taking ceremony  
महाराष्ट्र

राज्यपालांची ही फसवणूक, अजित पवार फुटतील वाटले नव्हते : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आम्ही आमदारांच्या उपस्थितीच्या सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे पक्षाचे समर्थन असल्याची  राज्यपालांनी शपथ घेतली असेल. असे मला वाटते. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यामुळे राज्यपालांची ही फसवणूक झाली आहे, असे म्हणावे लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

शरद पवार म्हणाले, की या सगळ्यातून मी गेलो आहे. आम्ही सर्वांनी मिळून फुटणाऱ्यांचा पराभव केलेला आहे. अजित पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय घेईल. सुप्रिया सुळे यांचा यात काही संबंध नाही. त्या खासदार आहेत. अजित पवार फुटून जातील असे कधीही वाटले नव्हते. मला पक्षाची चिंता वाटत आहे. ईडीच्या चौकशीमुळे गेले की काय माहिती नाही. जाणीवपूर्वक असे कोणी करत असेल तर आम्ही निर्णय घेऊ. 

महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तिन्ही पक्षांची तयारी झाली होती. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा या तिन्ही पक्षांकडे होते. पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणे निवडून आलेले सदस्य शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 46 असे 156 सदस्यांसोबत काही अपक्षांसोबत ही संख्या 170 च्या आसपास जात होती. काल बैठक झाल्यानंतर काही गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे होते. आज सकाळी सात वाजता एका सहकाऱ्याने कळविले आम्हाला येथे आणण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता राज्यपाल सर्व कामे सोडून तयार आहेत, याचे आश्चर्य वाटते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य त्याठिकाणी गेल्याचे कळाले. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे कळाले, असे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT