Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uniform Civil Code: 'समान नागरी कायद्या'पेक्षा 'लोकसंख्या नियंत्रण कायदा' आणा; शरद पवारांनी मांडली भूमिका

भाजपची विचारधारा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं घातक, त्यांच्याकडून वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न

Amit Ujagare (अमित उजागरे)

जळगाव : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधी आयोगानं नागरिकांकडून समान नगरी कायदा लागू करण्याबाबत सूचना मागवल्या आहेत. यावरुन केंद्र सरकारकडून हा कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. (Sharad Pawar spoke on Uniform Civil Code says India needs Population control act)

पवार म्हणाले, "सध्याचा देशपातळीवरील जो पक्ष आहे त्यांची जी विचारधारा आहे, ती सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं घातकं देखील आहे. त्यामुळं समान नागरी कायद्यासारखे सगळे प्रश्न घेऊन हे वेगळं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण याचा प्रस्ताव अद्याप पार्लमेंटरी कमिटी किंवा संसदेसमोर आलेला नाही. ज्यावेळी येईल त्यावेळी त्याची चर्चा होईल" (Latest Marathi News)

पण हा जो कायदा येणार तो नेमका कोणत्या स्वरुपाचा आहे. ज्यामध्ये एखादा समाज, एखादा धर्म, एखादी जात ही नजरेसमोर ठेऊन यांना टार्गेट करायचं आहे का? हे बघावं लागेल. त्यामुळं जोपर्यंत या कायद्याचा ड्राफ्ट आमच्यासोर येत नाही तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही. (Marathi Tajya Batmya)

अजित पवारांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायद्याला आपला पाठिंबा असेल असं म्हटलं होतं. यावर शरद पवार म्हणाले, यावर कोणाचंही मत असू शकतं. पण काहीही झालं तरी देशातील वाढती लोकसंख्येचा विचार देशाचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. त्याची कायम चर्चा होत असते. वाढत्या लोकसंख्येला नियंत्रण आणण्याच्या कायद्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT