Sharad Pawar was overwhelmed by the visit of a close friend Sakal
महाराष्ट्र बातम्या

जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले..

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (MP Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांची बागलाणचे नेते व शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सदिच्छा भेट घेतली. पाटील यांचे शेतकरी संघटनेच्या चळवळीपासून खासदार पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे व मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे जिवलग मित्राच्या भेटीतून सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने शरद पवार भारावून गेले.

खासदार शरद पवार यांनी नुकतेच एका ऑनलाइन मुलाखतीत लोकनेते, दलितमित्र, बागलाणचे माजी आमदार दिवंगत पंडितराव धर्माजी पाटील यांचा आवर्जून उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरवही केला होता. याचा संदर्भ देताना रामचंद्रबापू पाटील यांनी याबद्दल ‘कसमादे’वासीयांतर्फे पवारांचे ऋण व्यक्त केले. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत नाशिक जिल्हा आपल्यावर मनापासून प्रेम करतो, आपणही जिल्ह्यावरील प्रेम कधी कमी होऊ दिलेले नाही. विरोधकांच्या अपप्रचारामुळे विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा पराभव झाला. मात्र, बागलाणच्या विकासासाठी त्या सातत्याने झटत असतात. त्यामुळे त्यांना राजकीय ताकद देण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगताच पवारांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

यानंतर रामचंद्रबापू पाटील यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन सटाणा येथील परिवार संवाद यात्रेत त्यांनी वडील माजी मंत्री दिवंगत राजारामबापू पाटील आणि माजी आमदार दिवंगत पं. ध. पाटील यांच्या आपापसातील स्नेहबंधांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याबद्दल पाटील यांचे आभार मानले आणि ‘आपल्या कार्यशैलीत व व्यक्तिमत्त्वामध्ये दिवंगत राजारामबापू पाटलांची छबी दिसते’ असा गौरवाने उल्लेखही केल्याने प्रदेशाध्यक्ष पाटील खूपच भावुक झाले.

दरम्यान, याच सभेत माजी आमदार दीपिका चव्हाण यांना राजकीय ताकद देण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शब्द दिला होता. त्यानुसार दीपिकाताईंचे नाव पाठविण्यात आले असून, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या चर्चेनंतर लवकरच बागलाण तालुक्यास आनंदाची बातमी मिळेल, असेही पाटील यांनी शिष्टमंडळास सांगितले. शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष ज. ल. पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे, बाजार समितीचे माजी संचालक अनिल चव्हाण, निखिल पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

जयंत पाटील यांची भावुक पोस्ट…

शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांनी वडिलांचे स्मरण करून गौरव केल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अकाउंटवर या प्रसंगाचे छायाचित्र शेअर करत ‘तुमच्यामध्ये मला दिवंगत बापूंची छबी दिसते, आजोबांच्या (रामचंद्रबापूंच्या) या उल्लेखामुळे कधी नव्हे इतके मनस्वी समाधान लाभले’ ही भावनिक पोस्टही केली. या पोस्टला सोशल मीडियावर तासाभरातच लाखोंचे व्ह्यूज, तर हजारोंचे लाइक्सही मिळाले. अनेकांनी या प्रसंगावर भावनिक कमेंट्सही केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT