Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "...तर पवार साहेब एक दिवसही अजित पवारांना पक्षात ठेवणार नाही", भाजप नेत्याचं टीका

'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते' जयंत पाटीलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

सकाळ डिजिटल टीम

पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. जयंत पवार यांच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी टीका केली. त्यानंतर जयंत पवार यांनी आपल्या व्यक्तव्याची सारवसारव केली.

पहाटेच्या शपथ विधीच्या या वादामध्ये आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमद्धे भाजप नेते निलेश राणे यांनी लिहले आहे की, "पहाटेचा शपथविधी जर पवार साहेबांची खेळी होती तर खासदार सुळे या कॅमेरासमोर 'माझं घर तुटतंय' सांगून का रडल्या?? फडणवीस साहेबांचा मनाचा मोठेपण आहे की त्यांनी अजित पवारांची इज्जत रस्त्यावर काढली नाही, ज्या दिवशी जगाला खरं कळेल पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत."

Nilesh Rane

या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत 'फडणवीस साहेबांचा मनाचा मोठेपण आहे की, त्यांनी अजित पवारांची इज्जत रस्त्यावर काढली नाही, ज्या दिवशी जगाला खरं कळेल पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Fire: कैलास लस्सीच्या दुकानाला आग! कर्मचाऱ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या; Video Viral

Fake Milk Racket Manchar: मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भंडाफोड; २६ जणांवर गुन्हा, १३ अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

आमिर खानने लग्नात चांदीचं पैंजण का घातलेलं? व्हिडिओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात-

Latest Marathi News Live Update: पुणे-नाशिक रस्ता पाण्याखाली

Amit Satam: कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची आमदार साटम यांची मागणी

SCROLL FOR NEXT