मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. यावेळी सत्ताधारांसोबत विरोधक एकाच व्यासपीठावर दिसले. . या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार आणि भाजपाचे नेते आशीष शेलार यांच्या गटाची युती दिसून आली. यापार्श्वभूमिवर बोलताना “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.(Sharad Pawar Will Support Pm Modi In 2024 General Elections Says Ramdas Athawale )
२०२४ च्या निवडणुकीमध्ये शरद पवार मोदींना साथ देतील असं आठवले म्हणाले आहेत. असं मोठं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. तसेच, पवारांनी या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांबरोबर युती केली आहे. असही आठवले यावेळी म्हणाले.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे. शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये शेलार आणि फडणवीसांच्या निकटवर्तीयांशी युती करुन उद्धव ठाकरेंना टाकली असल्याचेही आठवले म्हणाले.
नेमकं काय म्हणाले आठवले?
शरद पवारांनी जी गुगली टाकली आहे त्यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तुम्ही जुने राजकारणी आहात. काय वाटतं तुम्हाला याबद्दल?” असा प्रश्न आठवलेंना विचारलं असता “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे.
त्यांनी या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांबरोबर युती केली आहे,” असं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे, “शरद पवार हे कधी गुगली टाकतील सांगता येत नाही. त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बोल्ड करणारी आहे,” असंही आठवले म्हणाले.
यासोबतच, “काँग्रेस पक्ष खिळखिळा झालेला आहे. विरोधक अशक्त आहेत. अशावेळेस नरेंद्र मोदींना साथ देणं हेच राजकीय परिपक्वतेचा विचार होऊ शकतो. शरद पवारांनी क्रिकेटमध्ये खेळी केली आहे तशी राजकारणातही खेळतील,” असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.