Sharad Pawar on Party Name and Symbol Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar on Party Name and Symbol: पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले, 'हा निर्णय....'

Sharad Pawar on Party Name and Symbol: निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला दिल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेला. काही दिवसांपुर्वी निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला दिल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष चिन्ह आणि नाव याबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक आहे, लोक सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल असं शरद पवारांनी म्हटलं आहे.(Sharad Pawars first reaction after Election commission giving party and symbol to Ajit Pawar group)

'निवडणूक आयोगाने आमचं पक्षाचं नावं आणि चिन्ह काढून घेतलं. आमचा पक्ष दुसऱ्यांना दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, पक्षाची उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला, असं देशात याआधी घडलेलं नव्हतं. पण, ते ही निवडणूक आयोगाने आज करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आणि त्यासंबधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे', असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असं असणार आहे.

नवं नावं फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत वैध

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हे नाव शरद पवार यांच्या गटाला देण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसते त्यामुळं चिन्हावर निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला दिलेलं हे नवं नाव हे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत अर्थात 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT