Sharad Pawars
Sharad Pawars  Sakal
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

धनश्री ओतारी

आज सकाळीच एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर आज त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा केली. या घोषणे नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असे म्हणत एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केलं आहे.(Sharad Pawar's reaction to Eknath Shinde as the Chief Minister Maharashtra Politics dro95)

श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.

स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असे ट्विट करत शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज फक्त एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे.

देवेंद्र फडणवीसांनी धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केलंय. २००४ पासून एकनाथ शिंदे विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT