Sharad Pawars visit to Holkar Wada Sharad Pawars visit to Holkar Wada
महाराष्ट्र बातम्या

पवारांची होळकर वाड्याला भेट; रयत शिक्षण संस्थेला पर्यायी जागा देणार?

सकाळ डिजिटल टीम

खेड : श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला होता. दिल्लीमधून ब्रिटिशांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्यच नव्हे तर जाट, शीख या समस्त हिंदू बांधवांना एकत्र करण्याचा मनसुबा रचला होता. महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान व होळकर घराण्याच्या (Holkar Wadya) देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या खेड तालुक्यातील वाफेगाव येथील होळकर वाड्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली.

वॉटर्लूच्या युद्धात महापराक्रमी नेपोलियन सम्राटाचा पराभव ज्या लॉर्ड वेलस्लीने केला त्या वेलस्लीला भारतात हरविण्याच्या महापराक्रम राजे यशवंतराव होळकरांनी केला. त्यांचे जन्मस्थान हे एक पराक्रमाचे प्रेरणास्थान आहे. होळकर घराण्यातील वारसांनी शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, तळागाळात सामान्यांसाठी व्हावा या हेतूने रयत शिक्षण संस्थेला ही गढी देणगीपत्राद्वारे दिली, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले.

हा उदात्त हेतू ठेवून हा होळकर वाडा (Holkar Wada) रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आजतागायत आहे. परंतु, प्रेरणास्थळे किंवा जन्मस्थळे इतरत्र होऊ शकत नाहीत. ज्या ठिकाणी श्रीमंत यशवंतराव होळकरांचा जन्म झाला त्याच ठिकाणी त्या गढीचे संवर्धन व्हावे आणि पुन्हा एकदा एक ऐतिहासिक वास्तू तिथे उभी राहावी यासाठी शासनाने पुन्हा लक्ष घालावे. शाळेसाठी गावात इतरत्र जागा उपलब्ध करून येथे रयत शिक्षण संस्थेची शाळा उभारावी ही सहकार्याची भूमिका आहे, असेही शरद पवार लिहितात.

इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील

रयत शिक्षण संस्थेला पर्यायी जागा देता येईल का?, ती कोणती असावी याची समस्त गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज मी इथे आलो आणि यात सकारात्मक चर्चा झाली. इथे स्मारक होण्यास कोणतीही अडचण नाही. याउलट हे स्मारक प्रेरणास्थळ राहीलच. परंतु, या भागाचा विकास घडविण्यासाठी स्मारकाचा मोठा वाटा राहील. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. इतर संलग्न गोष्टी विकसित होतील, असेही शरद पवार (Sharad Pawar) लिहितात.

गावात पाण्याची समस्या

गावात प्रामुख्याने पाण्याची समस्या आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पाण्याचा प्रश्नही लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल. वेळू नदीच्या पात्रात पाणी येऊन भूगर्भातील पाणी कसे वाढेल आणि वेळू नदीतील पाण्याचा फायदा इथल्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी होईल या दृष्टीने निश्चित पावले उचलली जातील. पुनश्च आवश्यकता पडल्यास मुंबईतही बैठकीची वेळ घेऊन बैठक घेतली जाईल, असेही शरद पवार लिहितात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या अली’ गाण्याचे गायक जुबिन गर्गचं निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान मृत्यू, संगीतविश्वाला मोठा धक्का!

कोकणातलं जीवन दाखवणाऱ्या युट्यूबर स्वानंदी सरदेसाईला कशी मिळाली 'दशावतार' मध्ये गाण्याची संधी?

Easy Navratri Vrat Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा खास कुरकुरीत अन् चविष्ट करंज्या; लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

IND vs PAK लढतीपूर्वी मोदी सरकारचा मॅसेज, ४ मिनिटांत सूत्र हलली अन् पाकिस्तानी खेळाडूंचा अपमान; हस्तांदोलन प्रकरणात मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

SCROLL FOR NEXT