solapur city crime sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरण! अपहरणकर्त्यांचा डाव पोलिस तपासात उघड; मुख्य सूत्रधार अमित सुरवसेच, ‘हा’ होता त्याचा प्लॅन, आमदार रोहित पवारांचा संबंध नाही

शरणू हांडे याचे आक्षेपार्ह, अश्लिल व्हिडिओ काढायचे की त्याला पुन्हा समाजात ताठ मानेने फिरता येणार नाही, असेही त्यांचे नियोजन असल्याची बाब आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आली आहे. अपहरण केलेल्या दिवशी रात्रभर त्याच्यासोबत हेच कृत्य करायचे होते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : अडीच महिन्यांपूर्वी शरणू हांडे याने मला व मित्राला मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. यापूर्वीही त्याने दमदाटी, धमकी, मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून शरणू हांडे याचे आठ-दहा अश्लील व्हिडिओ तयार करून ते समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यासाठी त्याचे अपहरण केले होते, अशी कबुली मुख्य सूत्रधार अमित सुरवसे याने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

शरणू हांडे याची टक्कल करून त्याला साडी नेसवायची आणि गाडीत गाणे लावून त्यावर त्याला नाचायला लावायचे आणि त्याचा लाइव्ह व्हिडिओ करायचा असा अपहरणकर्त्यांचा डाव होता. याशिवाय सर्वांनी अनैसर्गिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ काढायचे, गरजेनुसार ते समाजमाध्यमात प्रसारित करायचे. शरणू हांडे याचे आक्षेपार्ह, अश्लिल व्हिडिओ काढायचे की त्याला पुन्हा समाजात ताठ मानेने फिरता येणार नाही, असेही त्यांचे नियोजन असल्याची बाब आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आली आहे.

अपहरण केलेल्या दिवशी रात्रभर त्याच्यासोबत हेच कृत्य करायचे होते. अपहरणासाठी अमितने ६ ते १२ ऑगस्ट या सात दिवसांसाठी पुण्यातून एक चारचाकी भाड्याने आणली होती. या अपहरणाचा मुख्य सूत्रधार अमित सुरवसे हाच होता. त्याच्या या प्लॅनसाठी समर्थ वासुदेव भैरी, राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबूराव सुरपुरे, सुनील भीमाशंकर पुजारी, दिपक जयराम मेश्राम व अभिषेक नागेश माने यांनी साथ दिली. याशिवाय अपहरण प्रकरणात कोणाचाही हात नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस कोठडीत प्रत्येक संशयितांकडे स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.

आमदारांचा काहीही संबंध नाही

अपहरणकर्त्यांनी समोरील व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला व मला माफी मागायला लावली हा शरणू हांडेचा दावा पोलिसांनी खोडून काढला आहे. अपहरण केल्यानंतर शरणू हांडेला त्यांनी मारहाण केली, तोंडावर लाथाबुक्क्या घातल्या होत्या. त्याचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्याचे आढळले आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी त्यावेळी कोणालाही व्हिडिओ कॉल केला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Latest Marathi News Live Update: नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला

SCROLL FOR NEXT