Sharad Pawar Sadabhau Khot Shashikant Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shashikant Shinde : सदाभाऊंमध्ये भाजपरूपी सैतान घुसलाय; शरद पवारांवरील वादग्रस्त टीकेवर शिंदेंचा पलटवार

सध्या राज्यातील राजकारणाची पातळी संपली आहे. हे भविष्यासाठी धोकादायक आहे.

सकाळ डिजिटल टीम

सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतील नेते आहेत. आमचे त्यांच्याशी ऋणानुबंध आहेत. चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो.

Satara News : शेतकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही सदाभाऊंकडे पाहात होतो; पण भाजपमध्ये गेल्यानंतर ते बिघडले आहेत. त्यांच्यात भाजपरूपी (BJP) सैतान घुसला आहे. त्यामुळे ते खासदार शरद पवार यांच्यावर टीका करायला लागलेत, असा पलटवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

सातारा शासकीय विश्रामगृहात आमदार शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही कामगार चळवळीतील असून, सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतील नेते आहेत. आमचे त्यांच्याशी ऋणानुबंध आहेत. चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो.

पण, भाजपमध्ये गेल्यानंतर ते बिघडले आहेत. त्यांच्यात भाजपरूपी सैतान घुसला आहे. ते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करायला लागलेत हे दुर्दैव आहे. सध्या राज्यातील राजकारणाची पातळी संपली आहे. हे भविष्यासाठी धोकादायक आहे. आरोप, प्रत्यारोप, खालच्या पातळीवर करणे योग्य नाही.’’

असेच सुरू राहिल्यास राजकारणाविषयी लोकांत तिटकारा निर्माण होईल. राष्ट्रवादीतील दुफळीचा पक्षावर परिणाम होणार का, या प्रश्नावर आमदार शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, ‘‘खासदार शरद यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील आम्ही दोघे, तिघेच राहिलो आहोत. आता पुन्हा एकदा पक्ष वाढविण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे फुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT