Indrani-Mukherjee Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

शीना बोरा जिवंत! इंद्राणी मुखर्जीने पत्रातून केला धक्कादायक दावा

Sheena Bora Case: इंद्राणी मुखर्जीने CBI ला पत्र लिहून तिचा शोध घेण्याचं आवाहन केलं.

सुधीर काकडे

देशात काही गाजलेल्या हत्याकाडांपैकी एक म्हणजे शीना बोरा हत्याकांड. (Sheena Bora Case) या घटनेत आईनेच आपल्या मुलीची निर्घून खून केला होता. या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee) वेळोवेळी आपला जबाब बदलला आहे. त्यातच आता इंद्राणी मुखर्जीने एक धक्कादायक दावा केला असून, त्यामुळे सगळेच चक्रावले आहेत.

२०१२ साली झालेल्या या घटनेत इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी शीना बोरा हीचा खून केल्याचं समोर आलं होतं. मात्र आता इंद्राणी मुखर्जीने CBI च्या संचालकांना पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. या पत्रात तिने लिहिले की, "काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने आपल्याला सांगितलं की, तिला काश्मीरमध्ये शीना बोरा भेटली होती." त्यामुळे तिने सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. या पत्राव्यतिरिक्त, शीना बोराने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज देखील दाखल केला आहे. यावर देखील लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शीना बोरा हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक झाल्यापासून मुंबईतील भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिचा जामीन अर्ज गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. इंद्राणी मुखर्जी लवकरच वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi : साई बाबांच्या नगरीत हे काय सुरुय? संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत मोठी खळबळ, धक्कादायक कारण समोर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT