Sheetal Mhatre
Sheetal Mhatre Sakal
महाराष्ट्र

Sheetal Mhatre Video : "याचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये आहे"; नितेश राणेंचं सूचक वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण तापलं असून आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. या व्हिडीओचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये असून मातोश्री नावाच्या पेजवरुन व्हिडीओ पोस्ट झाल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

याबद्दल बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले, "शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओबाबत आज चर्चा झाली. मॉर्फ केलेल्या व्हिडीओबद्दल काही नावं समोर आली आहेत. मातोश्री नावाच्या पेजवरुन व्हिडीओ पोस्ट झाले आहेत. युवासेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी हे केलं आहे. त्यांच्या मागे जो मास्टरमाईंड आहे तो कलानगरमध्ये आहे."

राणे पुढे म्हणाले, "यांच्या सोबत जे आहेत ते चांगले आणि सोडून गेले ते वाईट, असं त्यांना वाटतंय. खरंच मर्दानगी असेल तर समोर येऊन बोला. तुम्ही जर हा खेळ सुरू केला, तर आम्ही पण करू. पार्टीचे अनेक व्हिडीओ आमच्याकडे आहेत. कलानगरमध्ये बसून सध्या बदनामी सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. शीतल म्हात्रेंची बदनामी झाली, त्याचा हिशोब द्यावा लागेल."

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. साईनाथ दुर्गे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. साईनाथ दुर्गे युवासेना सदस्य आहेत. शिवसेना युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी साईनाथ दुर्गे यांच्यावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT