Sheetal Mhatre
Sheetal Mhatre esakal
महाराष्ट्र

Sheetal Mhatre: उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द...शीतल म्हात्रेचे ट्विट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे एक ट्विट चर्चेत आलं आहे. सहा महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. त्याची आठवण करुन देत बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका. असा खोचक सल्ला दिला आहे. (Sheetal Mhatre Uddhav Thackeray Resignation of Legislative Council Maharashtra Politics)

"उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द आपण कधी पाळत नाहीतच, किमान जनतेला जाहीरपणे दिलेला शब्द तरी पाळा! मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे असं २९जून२२ रोजी बोलला होता. आठवतं का? आज त्याला सहा महिने झाले, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा. बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका." अशा आशयाचे ट्विट म्हात्रे यांनी केलं आहे.

क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरेंना विधिमंडळाचा सभासदही रहायचं नव्हतं. त्यामुळेच आमदारही न राहता केवळ शिवसेना भवनात राहून केवळ सेनेच्या पक्षप्रमुख पदाची धुरा सांभाळणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

पण बहुतेक आता उद्धव ठाकरेंचा निर्णय बदललेला दिसतो आहे. त्यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नाही आहे. अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT