Anand Sagar Shegaon  
महाराष्ट्र बातम्या

Anand Sagar : भाविकांसाठी खुशखबर! शेगावातील 'आनंद सागर' आध्यात्मिक केंद्र सुरू होणार, पण...

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : संत गजानन महाराज मंदिरामुळे शेगावची ओळख देशभरातच नाही तर जगात आहेत. मंदिरासह 'आनंद सागर' या मनोहारी उद्यानामुळे एक मोठे आध्यत्मिक पर्यटन केंद्र असा शेगावचा नावलौकिक आहे. परंतु, काही कारणास्तव आनंद सागर गेल्या काही वर्षांपासून बंद होते. त्यामुळे भाविकांसह येथील व्यावसायिकांमध्ये मोठी नाराजी होती.

गेल्या काही दिवसापासून आनंद सागर पुन्हा एकदा सुरू होणार अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती. आता संत गजानन महाराज संस्थाननेच एका फलकाद्वारे नम्र निवेदन देऊन फक्त आध्यत्मिक केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

आध्यात्मिक केंद्राचा काही भाग कोविड काळानंतर आहे त्या स्थितीमध्ये सुरु करण्यात आलेला आहे. प्रवेश सेवार्थ (निःशुल्क) राहील. वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा आहे. सायंकाळी ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजीत अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आली होती.

श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर, आर्थिक घडी निट बसल्यावर तसेच आवश्यक सेवाधाऱ्यांची सेवा व मुबलक पाणी उपलब्ध झाल्‍यावर आध्यात्मिक केंद्राची देखभाल-दुरुस्ती, काही भागाचे पुनर्निर्माण व पुढील विकास कार्ये हाती घेण्यात येतील. यास बराच कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT