Sada Saravankar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sada Saravankar: सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त ;प्रभादेवी राडा प्रकरणी पोलीसांची कारवाई

मुंबईत प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या गोळीबारप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. तसेच, पोलीसांकडून त्यांना समन्सदेखील बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून शनिवारी रात्री प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसी दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहेत. यामध्ये पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली.

याच मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढली. याप्रकरणी पोलिसांनी सरवणकर यांच्यासह इतर लोकांविरोधात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस सरवणकर यांची पिस्तूल पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आले आहे.

दादर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाकरे गटावर गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचे कलम लावण्यात आले होते. मात्र तपासात जबरी चोरी झाली नसल्याचे समोर आले असून ३९५ हे कलम काढण्यात आले आहे. त्यांची वैयक्तिक जामिनावर पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात येणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सडलेले आंबे आहेत; पोत्यातून आणलेला मृतदेह भररस्त्यात टाकून दोघे फरार, VIDEO VIRAL

Sassoon Hospital : दोन बाळांमधील मानसिक व्‍यंग टळले; ससूनमध्‍ये नवजात अर्भकांच्या जनुकीय चाचण्‍यांचा फायदा

Pune Cantonment : कॅंटोन्मेंटचा नागरी परिसर महापालिकेत विलीन होणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

India vs England 3rd Test: क्रिकेटच्या पंढरीत कोण मारणार बाजी? लॉर्डसवर आजपासून भारत-इंग्लंड मालिकेतील तिसरा कसोटी सामना

SCROLL FOR NEXT