Rahul Shewale vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : शिवसेनेत कोणती निवडणूक झालीच नाही; शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपध्दतीनुसार ठाकरेंची नेमणूक झाली तर त्याची माहिती द्यावी.

मुंबई : 2013 नंतर शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आला, त्यामुळं निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या घटनेवर आक्षेप घेतलाय. उद्धव ठाकरेंनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची असल्याचा पलटवार शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) पत्रकार परिषदेत केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काही वेळापूर्वी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचं म्हणत शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचं म्हटलं होतं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषद घेतली.

खासदार शेवाळे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपध्दतीनुसार ठाकरेंची नेमणूक झाली तर त्याची माहिती द्यावी. शिवसेनेतील इतर पदं कशी भरली याचीही माहिती द्यावी. विभाग, गटप्रमुख ही पदं भरताना कुठे जाहिराती दिली, किती अर्ज आले हेही दाखवावं, असं आव्हान शेवाळेंनी ठाकरेंना केलंय. महाराष्ट्राच्या जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

राहुल शेवाळे म्हणाले, ज्या नियुक्या झाल्या त्या लोकशाही मार्गानं झाल्या. 2013 आणि 2018 नंतर शिवसेनाप्रमुख पद तसंच ठेवत शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण केलं. 2013 आणि 18 नंतर अनिल देसाई यांनी जी प्रक्रिया सांगितली त्या प्रमाणं निवडणूक होते, अर्ज मागविले जातात. 2013 आणि 2018 मध्ये कुणी अर्ज केला, पक्षप्रमुख पदासाठी तेव्हा आमचा उद्धव ठाकरेंना सर्वांचा पाठिंबा होता. मात्र नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखासाठी मतदान झाले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT