Eknath shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde Latest News : सत्तेतून बाहेर पडणार शिंदे गट? अंतर्गत हालचालींना वेग

Maharashtra Politics Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, पक्षाची भूमिका आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ajit Pawar Latest Update : अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. कोणता खरा राष्ट्रवादी पक्ष? हा प्रश्न सध्या जनतेच्या मनात आहे. सरकारमध्ये विद्यमान परिस्थितीत तीन पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे एका पक्षाची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर बंडखोर नेत्यांनी पक्ष संपत असल्याचं विधान केलं होतं.

अजित पवार निधी देत नव्हते, ते पक्ष संपवत होते आणि राष्ट्रवादी वाढवत होते, असा ठपका ठेवण्यात आलेला होता. तर आता ज्या पक्षामुळे बंड केलं त्याच पक्षासोबत महायुती केल्यामुळे शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार व पक्षातील नेत्यांवर दबाव वाढला आहे. सरकारमध्ये अजित पवार व इतर सहकार्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. याबाबत काही नेत्यांनी बोलताना याबद्दल माहीती नसल्याचं सांगितलं. तर अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागाबाबत कुणालाच विश्वासात न घेतल्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचे सुर दिसून आले.(Latest Marathi News)

तर शिवसेना-भाजप यांच्या युतीला 1 वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात मंत्रीमंडळाचा विस्तार न करता, अजित पवारांच्या पक्ष प्रवेशानंतर विस्तार करून त्यातही स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील इच्छुक आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

अजित पवार आणि इतर नेत्यांच्या शपथविधी नंतर शिवसेनेचे सरकारमधील महत्व संपवले जात असल्याची कुजबूज शिवसेनेच्या आमदारांमध्ये, सुरू आहे. राष्ट्रवादी विशेष म्हणजे अजित पवार यांचे कारण देऊनच पक्षात बंड करत वेगळी चूल मांडली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे कसे यासारख्या प्रश्नांमुळे आमदारांची गोची झाली आहे.(Latest Marathi News)

बदललेली राजकिय परिस्थिती, आमदारांमधील अस्वस्थता आणि नवी समिकरणे बसण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेना मंत्री, आमदार, आणि खासदार यांची आज बैठक बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरातून तातडीने मु्ंबईला रवाना झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींना राजभवनात त्यांनी सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईच्या दिशेने निघाले.

शिंदे गटाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, पक्षाची भूमिका आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT