Shivsena MLA Disqualification Case Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena MLA Disqualification Result: शिंदेंची सेना जिंकली! 16 बंडखोर आमदार ठरले पात्र; मुख्यमंत्रीपदही वाचलं

राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Shivsena MLA Disqualification Result: राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे. यामुळं ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे. (shinde group won shivsena mlas disqualification result declaired by rahul narvekar marathi news)

निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली. त्यानंतर नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले. तसेच ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले. (Latest Marathi News)

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा ४५ मनिटे उशिरा नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला. (Marathi Tajya Batmya)

नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचे ठळक मुद्दे असे...

१) शिवसेनेची १९९९ ची घटना मान्य तर २०१८ सालची घटना दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही.

२) शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे.

३) राष्ट्रीय कार्यकारिणीत १९ मधील १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते.

४) २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत.

५) त्यामुळं शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणत्याही नेत्याच्या हकालपट्टीचा अधिकार नाही

६) नवा नेता निवडायचा अधिकार पक्षाला आहे.

७) त्यामुळं भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध

८) मिलिंद नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना सुरतला भेटले त्यामुळं आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही, हे मान्य करता येणार नाही.

९) संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही.

१०) २१ जून २०२१ च्या बैठकीच्या हजेरीपत्रकाची मूळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावतीमुळं हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही.

शिंदेंच्या शिवसेनेवर खरा पक्ष म्हणून शिक्कामोर्तब

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं. तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली. तसेच यामुळं शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असंही यावेळी नार्वेकर यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT