Pankaja Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडे ठाकरे गटामध्ये जाऊन नेमकं काय करणार? केसरकर स्पष्टच म्हणाले...

पंकजा मुंडे यांना शिवसेनेच्या ठाकरे गटात येण्यासाठी ऑफर

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटात येण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया सवण्यात येत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या या ऑफरवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खिल्ली उडवली आहे.

तर पंकजा मुंडे ठाकरे गटात येऊन काय करणार? असा प्रश्नही दीपक केसरकर यांनी केला आहे. तर पंकजा मुंडे ठाकरे गटामध्ये येऊन नेमकं काय करणार? पंकजा मुंडे यांना ठाकरे गट राज्यसभेवर तर पाठवू शकत नाहीत. तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हंटलं आहे. आधीच त्यांची बोलणी प्रकाश आंबेडकरांशी सुरू आहे. तिथेही राष्ट्रवादीवर विश्वास नसल्याचेही केसरकर यांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

पंकजा मुंडेंना अशोक चव्हाणांचा खास सल्ला

पंकजा मुंडे या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांना उत्तम राजकीय जाण आहे. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यावर जास्त फायदा आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये वारंवार अन्याय होत आहे. त्यांना डावलण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं काम मी पाहतोय. सभागृहात त्या प्रभावीपणे काम करतात. त्यांना उत्तम जाण आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणत्या पक्षात जावं, यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. कुठल्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो, हे त्यांनी ठरवायचंय, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT