Aditya Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackrey: 'तो बिटवा चला बिहार' आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर नरेश म्हस्केंची टीका

आदित्य ठाकरे आज एक दिवसासाठी बिहार दौऱ्यावर जात आहेत

सकाळ डिजिटल टीम

आदित्य ठाकरे आज एक दिवसासाठी बिहार दौऱ्यावर जात आहेत. आदित्य ठाकरे बिहारची राजधानी पाटणा येथे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरुन आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्यांनी बाळासाहेबांचा नेहमी विरोध केला, त्या लोकांना हे स्वत: जाऊन भेटत आहेत, असं नरेश म्हस्के यांनी यावेळी म्हंटलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याबद्दल बोलताना म्हस्के म्हणाले की, ठाकरे यांचा जीव मुंबईत अडकला आहे. मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या बघता त्यांची मत मिळवण्यासाठी हा बिहार दौरा केला जातोय. उत्तर भारतीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. ज्या लालूप्रसाद यादव आणि या सर्व मंडळींनी नेहमीच शिवसेनाचा विरोध केला आहे. कायम ही मंडळी बाळासाहेबांच्या विरोधात बोलली आहे आणि त्यांनाच हे जाऊन भेटत आहेत. त्यांनी इकडे येऊन भेटायला हवं तर हे त्यांना भेटायला तिकडे जात आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, ज्या ज्या लोकांनी बाळासाहेबांचा विरोध केला आहे ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते..ती मंडळी आता यांना जवळची वाटत आहे. हे आपल्या स्वभावाप्रमाणेच चालले आहेत. त्या तेजस्वी यादव यांनी यांना येऊन भेटायला पाहिजे. मात्र, हेच जाऊन भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी भेटायला जातात तेव्हा हे लोक त्यांच्यावर टीका करतात. मात्र, आता हे तर एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. काय वेळी आली आहे. केवळ लाचारी आणि लाचारी, उत्तर भारतीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं चाललं आहे. कदाचित एखादं पेंग्विन पार्कसुद्धा काढायचं असेल, त्याच्यासाठी हा दौरा असेल, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

या संदर्भातील व्हि़डीओ शेअर करत नरेश म्हस्के यांनी 'हार गये यहापर तो..बिटवा चला बिहार, कुर्सी दो, कुर्सी दो..यही इसकी पुकार!' कॅप्शनही दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT