Shinde vs Thackeray news cm Shinde faction MLAs will meet Rahul Narvekar today maharashtra politics  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde vs Thackeray : शिंदे गटाचे आमदार आज नार्वेकरांच्या भेटीला; करणार 'ही' महत्वाची मागणी

सकाळ डिजिटल टीम

Shinde vs Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दोन्ही दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातवरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

यानंतर निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. यादरम्यान शिंदे गटाचे आमदार हे आज सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन महत्वाची मागणी करणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

शिंदे गटाचे आमदार शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालय शिंदे गटाला सोपवावं यासाठी ते मागणी करणार आहेत. सकाळी १० वाजता ही भेट होणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांना बाळासाहेबांची शिवसेनेच्या ऑफीसमध्ये जमायला सांगण्यात आले आहे.

त्यानंतर सकाळी दहा वाजता हे सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत. ही भेट २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या अधिवेशन बजेटमध्ये शिवसेनेचं विधीमंडळातील अधिकृत कार्यालय हे एकनाथ शिंदे गटाला देण्यात यावं अशी मागणी करण्यात येणार आहे.

नागपूर अधिवेशनाच्या वेळी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्हीना वेगवेगळे ऑफिसेस देण्यात आले होते. आता निवडणुक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव दिलं असल्याने त्यांच्याकडूवन शिवसेनेच्या कार्यालयावर दावा सांगण्यात येतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात...

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Latest Marathi News Live Update : माणुसकीची भिंत २०२५ उपक्रमाची सुरुवात

SCROLL FOR NEXT