Shinde Vs Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Thackeray : "न्यायालय देखील चुकू शकतं" ; उल्हास बापट असं का म्हणाले?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजचा युक्तिवाद संपला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडं जाणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या सुनावणीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या तीन दिवसात न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे कोर्ट रेबिया प्रकरणानुसार निर्णय देणार की नबाम रेबिया प्रकरणातील निकालात सुधारणा करणार?, यावर उल्हास बापट यांनी त्याचे म्हणणे मांडले.

उल्हास बापट म्हणाले, न्यायालय देखील चुकू शकतं. न्यायालयाने आपले आधीचे निर्णय यापूर्वी फिरवले आहेत. न्यायालय चुकत नाही असं नाही. याआधी न्यायालयाने गोलकनाथ केसचा निकाल पुढे १३ जणांच्या घटनापीठाने बदलला होता. आधीचे निर्णय कोट केले जातात. त्यातील काही चुका सुधारून सात न्यायाधीशांचं बेंच सुधारून तो निर्णय संपूर्ण देशाला लागू होतात. 

दरम्यान कोर्टाने निर्णय राखून ठेवल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी न्यायालयीन लढाई सध्या खूपच अटीतटीची बनली आहे. 


कुठल्या मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित?

  1. प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं जाणार की नाही?

  2. नबाम प्रकरणानुसार सत्तासंघर्षाची सुनावणी होणार का?

  3. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नक्की काय आहेत?

  4. अपात्रतेच्या नोटिसांवर कारवाई नक्की कोणी करायची?

  5. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा योग्य होता का?

  6. सध्याचे सरकार राहिल की जाईल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT