Shirdi Bus Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shirdi Bus Accident : मोठी अपडेट! बस चालक चालवत होता रफ गाडी; सूचना देऊनही...

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मोरीवली गावातील मंडळी गुरुवारी रात्री मोठ्या आनंदात निघाली होती. मात्र शुक्रवारची पहाट उगवत नाही तोच गावकऱ्यांचे फोन खणाणले. देव दर्शनाला गेलेल्या बसचा अपघात झाला असून 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची वार्ता गावभर पसरली आणि गाव शोक सागरात बुडाले. आता या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Shirdi Bus Accident news in Marathi)

अंबरनाथ मधील मोरीवली हे जवळपास 4 ते 5 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाच्या चारही बाजूने कारखाने असून अंबरनाथ, डोंबिवली एमआयडीसी मध्ये काम करणारे कामगार या मोरीवली गावात स्थायिक झाले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याच गावात महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनी असून या कंपनीचे मालक हे गेल्या 30 वर्षांपासून भाविकांसाठी शिर्डी साईबाबा देवदर्शन यात्रेचे आयोजन करतात.

गेल्यावर्षी या गावातून 5 बस शिर्डीला गेल्या होत्या. यावर्षी गावातून तब्बल 15 बस शिर्डीला रवाना झाल्या. कंपनीचे पॅकेजिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच घरगुती पॅकेजिंगचे काम करणाऱ्या महिलांना वर्करना या दर्शनाचे फ्री पास देण्यात आले होते. फ्री पास मिळाल्याने महिलांनी घरच्यांकडे देव दर्शनाला जाण्याचे हट्ट धरले. गावातून तब्बल 700 च्या आसपास नागरिक शिर्डीला जाण्यास तयार झाले.

गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास बस गावातून शिर्डीला जाण्यास रवाना झाल्या. चहा पानासाठी रात्री बस थांबली असता काही भाविक हे ओळखीच्या लोकांसोबत प्रवास करता यावा म्हणून अपघात झालेल्या बस मध्ये येऊन बसले आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर काही जण आपण बस बदली केल्याने वाचलो देवाची कृपा होती म्हणून हे घडून आले अशी भावना व्यक्त करत होते. तसेच बस चालक हा रफ गाडी चालवीत होता. रात्रीची वेळ असल्याने नागरिकांनी त्याला रफ गाडी चालवू नको अशी सूचना देखील केली होती, असे गावकऱ्यांना समजले.

दरम्यान शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या एका बसचा अपघात झाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईकांनी आपापल्या घरच्यांना फोन करून नक्की काय झाले याची माहिती घेऊ लागले. गावाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या घटनेत गावातील 8 जणांवर काळाने एकाच दिवशी घाला घातला.

हेही वाचा सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Job: एक लाख पगार, काम फक्त खायचं; वजन वाढलं तरी फायदाच! कुठे आहे ही नोकरी?

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

PMO and Raj Bhavan renamed : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘पीएमओ’ अन् ‘राजभवन’ नावात केला बदल

Pune News : घोटवडे येथील रस्त्यावर दोन रिक्षासमोरासमोर धडकल्याने ३४ वर्षीय चालकाने आपला जीव गमावला!

Latest Marathi News Live Update: उमरगा पालिकेसाठी ६६. ८१ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT