Naresh Ubale and Vaishali Ubale  
महाराष्ट्र बातम्या

Shirdi Bus Accident : सुट्टी बेतली जीवावर! पहिल्यांदाच सहकुटुंब फिरायला गेले अन् लेकरं...

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - कामामधून सुट्टी मिळत नसल्याने पत्नी व मुलींना त्याला वेळ देता येत नसे. पत्नीला शिर्डीला देवदर्शनाला जाण्याचे पास मिळाले आणि तिने पतीकडे साईबाबा दर्शनाला जाण्याचा हट्ट धरला. कुटुंबाला वेळ देण्यासाठी नरेश यांनी देखील कामावरून एक दिवसाची सुट्टी घेतली. आणि ही एक दिवसाची सुट्टी त्यांच्यासह पत्नी वैशालीच्या जीवावर बेतली. (Shirdi Bus Accident news in Marathi)

शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात नरेश व वैशाली यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आई वडिलांच्या निधनाने निधी व मधुरा या त्यांच्या दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत.

शुक्रवारी सकाळी नाशिक येथील सिन्नर शिर्डी महामार्गावर शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. या अपघातात अंबरनाथ मधील मोरीवली गावातील नरेश उबाळे ( वय 38) व वैशाली उबाळे (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. मोरीवली गावात नरेश हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी वैशाली ही याच गावातील एका कंपनीतील कपडा पॅकिंग करण्याचे घर बसल्या मिळणारे काम करत होती. याच कंपनीतून तिला शिर्डीला देव दर्शनाला जाण्याचे पास मिळाले. हे पास मिळाल्याने तिने पती नरेश याच्याकडे शिर्डीला जाण्याचा हट्ट केला. नरेश हा एका वाईन शॉप मध्ये काम करत असल्याने त्यांना जास्त सुट्टी मिळत नसे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्यांनी देखील पत्नी वैशालीचे म्हणणे ऐकले आणि एक दिवसाची सुट्टी घेतली. गुरुवारी रात्री 12 वाजता गावातून बस दर्शनाला निघाली होती.

नरेश यांना 3 मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण 17 सदस्य या शिर्डीच्या देवदर्शनाला गेले होते. नरेश देखील पत्नी वैशाली मुलगी निधी व मधुरा सह शिर्डीला निघाले. पहाटे झालेल्या अपघातात नरेश व वैशाली यांचा मृत्यू झाला. तर 9 वर्षीय निधी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT