amol kolhe- ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : शिरुर लोकसभेच्या जागेबद्दल पवार स्पष्ट बोलले; 'ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे त्यांनाच...'

संतोष कानडे

पुणेः मागच्या काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अमोल कोल्हे यांना डावलून पक्ष दुसऱ्या कुणालातरी संधी देणार आहे, असं बोललं जात आहे. यापूर्वीही अजित पवारांनी याबाबत भाष्य केलं होतं. आजदेखील ते शिरुरच्या जागेबद्दल बोलले आहेत.

नेमकी चर्चा काय सुरुय?

शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी पुन्हा शड्डू ठोकला आहे. तसेच, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही ‘शर्यत अजून संपलेली नाही,’ असे म्हणत आपण अजूनही उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केले आहे, त्याचबरोबच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय देतील, तो आपल्याला मान्य असेल, असेही त्यांनी म्हटलं होतं.

यावर शुक्रवारी बोलतांना अजित पवार म्हणाले होते की, विलास लांडे हे एकेकाळचे आमचे आमदार आहेत. त्यांना आम्ही महापौर केलं होतं, त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपशय आले होते. आता कदचित त्यांनी अधिक जोमाने गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल. त्यामुळे तेही इच्छूक असतील.

आज अजित पवार काय म्हणाले

आज पत्रकारांनी अजित पवारांना शिरुरच्या जागेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांना संधी मिळेल. मग तो नवीन असेल नाहीतर जुना. आम्ही पक्षाचे सर्व नेते बसून शिरुरमध्ये मार्ग काढू. ज्या जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील त्या सर्व जागांच्या बाबतीत तोडीस तोड उमेदवार देऊ, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, सोलापूर येथे बोलतांना जयंत पाटील यांनी शिरुरमध्ये दुसऱ्या कुणाच्याही नावाचा विचार नाही, असं म्हटलं होतं. एकूणच शिरुरच्या जागेवरुन सध्या जोरदार वादंग सुरु आहे. एकीकडे अजित पवार बसून मार्ग काढू असं म्हणत आहेत तर दुसरीकडे जयंत पाटील अमोल कोल्हेंच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT