Raj Thackeray
Raj Thackeray Team eSaka
महाराष्ट्र

शिवाजी पार्कवर शिवजयंती; राज ठाकरेंकडून मनसैनिकांना शपथ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti ) मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. दरवर्षी शिवसेनेकडून विविध भागांमध्ये कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मोठ्या उत्साहाने राज्यभरात शिवजयंती साजरी केली जात असून, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित मनसैनिकांना शपथ दिली. यावेळी शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टीदेखील करण्यात आली. (Raj Thackeray Give Oath To MNS Supporters At Shivaji Park)

राज ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्यांना शपथ

शिवाजी पार्क येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत पक्षातर्फे शपथ दिली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ''आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसविण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसरून महाराष्ट्र सुराज्य व्हाव म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहिल, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुलं शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहरं, गावं, पारं, तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, तसेच आमच्या शेतकरी बंधु-भगिनींना त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल, कामगारांना न्याय मिळेल यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभीमानी, स्वावलंबी स्वराज्यांचे स्वप्न आम्हाला दिलं आहे, त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू, आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सौनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.'' अशी शपथ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित लाखो मनसे कार्यकर्त्यांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT