Shiv Jayanti
Shiv Jayanti sakal
महाराष्ट्र

Shiv Jayanti Fact Check: इंग्रज इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे शिवरायांना अक्षरज्ञान नव्हते? खरे पुरावे जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Shiv Jayanti : आज १९ फेब्रुवारी शिव जयंती. संपुर्ण देशात आणि महाराष्ट्रात शिव जयंती उत्साहास साजरी केली जाते. लोकांचा जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक शिवप्रेमींचे आदर्श आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार प्रत्येकाला प्रेरीत करतात.

क्षत्रियाच्या मुलास आवश्यक असलेले शिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वाभाविकपणे मिळाले. अश्वारोहण, दांडपट्टा, तलवारीचे हात, नेमबाजी इ. क्षात्रशिक्षण शिवरायांना बालपणी मिळाले परंतू शिवरायांना लिहिण्या वाचण्याचे शिक्षण मिळाले होते का? असा एक प्रश्न अनेक इतिहासकारांनी उपस्थित केलेला आढळतो. (Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti proof on Shivaji Maharaj have Knowledge of Letters English Historian)

इंग्रज इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे शिवरायांना अक्षरज्ञान नव्हते का? हे खरं आहे की खोटं, याविषयी इतिहासात काही पुरावे आहेत. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

इतिहासकार, ग्रैंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांना अक्षरज्ञान नव्हते असे म्हटले आहे. ख्यातनाम इतिहासकार, यदुनाथ सरकारने शिवरायांनाअकबर, हैदरअली, रणजित सिंह यांच्याप्रमाणे निरक्षर होते असे मत व्यक्त केलेले आहे.

शिवरायांच्या हस्ताक्षरांचे कागद प्रत्यक्षात सापडलेले नसले तरी शिवरायांना निरक्षर ठरविणे अन्यायकारक आहे. कारण शिवरायांना लिहितावाचता येत होते हे अप्रत्यक्षपणे सिद्ध करण्यास काही समकालीन पुरावेसुद्धा सापडतात.

फॅक्टरी रेकॉर्डमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अक्षरज्ञान चांगले होते याविषयी खात्री देणारे पुरावे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवरायांचे वडील शहाजीराजे आणि पुत्र संभाजीराजे हे संस्कृत भाषेचे जाणकार होते. स्वतः शिवाजी महाराजांनी 'राज्यव्यवहार कोश', 'करण कौस्तुभ' यासारखे संस्कृत ग्रंथ विद्वानांकडून लिहून घेतले.

शिवभारतकार परमानंद हे तर प्रत्यक्ष शिवरायांच्या दरबारात होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवरायांना निरक्षर ठरविणे हे निश्चितपणे अन्यायकारक आहे. शिवभारतमध्ये शिवाजी महाराजांना लिपीग्रहणयोग्य वयाचा झाल्यावर शहाजींनी त्यांना गुरूंच्या स्वाधीन केले असा उल्लेख आलेला आहे.

शिवभारतातील नवव्या अध्यायातील उल्लेखावरुन शिवाजी महाराज हे साक्षर होते, हे स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये शहाजीराजेंच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना शहाणे केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवरायांच्या साक्षरतेची खात्री पटविण्यास पुरेसा आहे.

(संदर्भ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तर्फे प्रकाशित 'छत्रपती शिवाजी महाराज' पुस्तक, लेखक - प्र. न. देशपांडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT