Shiv Rajyabhishek Din 2023 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Rajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवरायांच्या काही शब्दांच्या राजमुद्रेत दडलाय सखोल अर्थ; जाणून घ्या...

ही राजमुद्रा हिंदवी स्वराज्याची भूमिका, ताकद स्पष्ट करते. काय आहे याचा अर्थ?

वैष्णवी कारंजकर

शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी साजरा होत आहे. ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हा सोहळा ९ दिवस चालला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक परकीय आक्रमकांच्या तावडीतून प्रदेशाला सोडवून स्वराज्याची निर्मिती केली.

अशा छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवण्यासाठी निजामशाही, आदिलशाही, मोगल अशा अनेकांशी सामना केला. देश या परकीय शत्रूंच्या तावडीत सापडलेला असताना स्वतः स्वराज्य निर्माण करून राज्याभिषेक करून घेणं, ही गोष्ट सोपी नव्हतं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे शिवरायांचे वडील शहाजीराजेंचं होतं. हे स्वप्न पूर्ण कऱण्याची अपेक्षा छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली आणि इतिहास घडवला.

शहाजीराजांनी शिवरायांना राजमुद्रा आणि प्रधानमंडळ दिलं. या राजमुद्रेत सखोल अर्थ आहे. ही राजमुद्रा हिंदवी स्वराज्याची भूमिका, ताकद स्पष्ट करते. काय आहे हा अर्थ?

काय आहे राजमुद्रा?

"प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।

शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।"

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दररोज वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ होतो.

या राजमुद्रेच्या अर्थावरुन आपल्याला शहाजीराजांचे विचार आणि बुद्धीची प्रचिती आपल्याला येते. राजमुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरला गेला आहे. प्रतिदिन वाढत जाणारं हे राष्ट्र स्वसुखासाठी नाही, तर प्रजेच्या हितासाठी आहे, त्यामुळे ही मुद्रा विश्ववंद्य होईल, असा हेतू या राजमुद्रेतून स्पष्ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

SCROLL FOR NEXT