Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र

‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासाला आता महाविकास आघाडी सरकारमध्ये नवे धुमारे फुटले असून, हा तपास केंद्र सरकारकडे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे देशभरात चर्चिल्या जाणाऱ्या या प्रकरणाचा तपास मोदी सरकारच्या नियंत्रणाखालील यंत्रणेला देण्याचा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या ‘दालनात’ पडला आहे.

या प्रकरणाशी संबधित एल्गार परिषदेचा तपास राष्‍ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचा या निर्णयाला विरोध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेचा तपास राज्य सरकारचे पोलिस करत आहेत. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान गृहमंत्रालयाने राज्याचे महाधिवक्ता यांचा ‘एनआयए’ संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र सरकार केंद्राची कारवाई रोखू शकत नाही. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रीय हिताला बाधा आणणारी कलमे लावण्यात आली आहेत अशा वेळी ‘एनआयए’ ला तपास हाती घेण्याचा अधिकार आहेत, असा अभिप्राय महाधिवक्‍त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकारला पत्र लिहले असून यामध्ये तत्कालिन फडणवीस सरकारच्या भूमिकेवरच आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. 

या हिंसाचारप्रकरणी नव्याने चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी केली होती शरद पवार यांनी केली होती. या पत्रानंतर केंद्र सरकारने तातडीने सदरचा तपास ‘एनआयए’कडे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, राज्य सरकार हतबल असल्याचे समोर आले आहे. ‘एनआयए’कडे तपास देण्याशिवाय राज्य सरकारला पर्याय नसल्याचेच सूचोवाच अनिल देशमुख यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. यामुळे, ‘एनआयए’कडे तपास देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT