sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

2024 नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी; सीमोल्लंघनाचे राऊतांचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मोठं वक्तव्य केलंय. शिवसेना आता सीमोल्लंघन करुन राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, असं महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर केलंय. आजच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून नियमांचं पालन करुनच मेळावा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे या बोलतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. शस्त्र कधी, कुणासाठी काढायची असतात हे सायंकळी ठाकरेंच्या भाषणात कळेल.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ओटीटी आणि ड्रग्जसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर त्यांनी म्हटलंय की, नोटाबंदीनंतर मोदींचं वक्तव्य होतं की, नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना मिळणारा पैसा बंद होईल. आज चार वर्षानंतरही सरसंघचालक त्यावर चिंता व्यक्त करत आहेत. म्हणजे चिंतेची बाब आहे. सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केलीय की ड्रग्जचा पैसा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. या चिंतेशी आम्ही सहमत आहोत. सरकार भाजपचं आहे. मोदीचं आहे. ते जर रोखू शकत नाही तर कोण रोखणार? असा सवाल त्यांनी केलाय.

आम्ही राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असू

शिवसेना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेच. सध्या 21 खासदार आहेत आमचे आता 22 होतील. भविष्यामध्ये 2024 नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatkal Ticket New Rules : 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; रेल्वे स्थानकांवर लागू होणार नवी टोकन प्रणाली

Who is Saransh Jain? भारताच्या कसोटी संघात एन्ट्री घेणारा सारांश जैन कोण? त्याची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी का इतकी महत्त्वाची?

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

बापरे! ज्युनियर एनटीआर जखमी, खांद्याला झाली गंभीर दुखापत

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

SCROLL FOR NEXT