udhav thakare  
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना सावध! सर्व आमदारांना सुरक्षितस्थळी पाठवणार; सोमवारी बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभेसाठी १० जूनला निवडणूक होऊ घातली आहे. महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी चांगली चुरस पाहायला मिळत आहे. भाजपने (bjp) उमेदवार दिल्याने चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेच्या (Shiv Sena) सर्व आमदारांना सुरक्षितस्थळी (MLAs will be sent to a safe place) पाठवले जाणार आहे. यासाठी सर्व आमदारांना सोमवारी (ता. ६) वर्षा बंगल्यावर बोलावल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

जून ते ऑगस्ट या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना निवृत्त होणाऱ्या सदस्यांमुळे रिक्त होणार असलेल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक घेतली जाईल आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेसचे नेते अंबिका सोनी, जयराम रमेश, कपिल सिबल आणि बसपचे सतीशचंद्र मिश्रा यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून सहा जण राज्यसभेवर जाणार आहेत. यामुळे येथे चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी मोठी स्पर्धा होत आहे. सर्वच पक्ष आपलाच उमेदवार जिंकणार असल्याची भाषा करीत आहे. यात शिवसेना व भाजप (bjp) आघाडीवर आहे. भाजपने उमेदवार दिल्याने चुरस पाहायला मिळणार आहे. मत फुटू नये म्हणून शिवसेनेने सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचा सावध पवित्रा

मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेने सर्वच आमदारांना (MLA) वर्षा बंगल्यावर बोलावले आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शिवसेनेचे (Shiv Sena) व अपक्ष आमदारांना सुरक्षितस्थळी पाठवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT