Shiv Sena has started signing the MLAs 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेच्या आमदारांची सह्या घेण्यास सुरवात; जोरदार हालचाली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या असून, शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सर्व आमदारांच्या सह्या घेण्यास सुरवात झाली आहे. 

मालाडमधील दी रिट्रीट हॉटेलमध्ये थांबलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्र येण्याचे आदेश सेनेने दिले आहेत. उदय सामंत यांनी आघाडी घेत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. या सह्या नक्की कोणाच्या समर्थनार्थ आहेत, याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेकडे 56 आमदार असून, सत्ता स्थापनेत शिवसेना कोणाची मदत घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत.  

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. सत्तेत मुख्यमंत्रिपदाचे मानाचे पान मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसमोरची राजकीय आव्हाने वाढली आहेत.

भाजपने शिवसेना सोबत नसेल, तर सत्तास्थापन करण्यास असमर्थता व्यक्त करीत धक्कातंत्रांचा वापर करीत शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी ‘खो’ दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा निवडून आल्याने शिवसेनेने ५६ जागांच्या बळावर भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार तर झाला नाहीच; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून भाजपवर दबाव वाढविण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून होत होता. मात्र, शिवसेनेची ही सगळीच गणिते फिस्कटल्याने शिवसेनेची आव्हाने वाढली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT