गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं : नारायण राणे
नाशिक : मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरेंचाच हात आहे. त्यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये. गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) केला. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
ज्या व्यक्तीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळं मुख्यमंत्री पद मिळालं आणि ज्यांच्या मुलाला लोकसभेत शिवसेनेनंच पाडलं आहे. अशा व्यक्तींनी शिवसेनेला शिकवू नये, असं वक्तव्य दानवेंनी केलं. मनमाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात सध्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किमान राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणीही दानवेंनी केली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा देवेंद्र फडवणीसांनी पोलिसांना बोनस देण्याची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यावर आपण केलेल्या वक्तव्याचा फडणवीस यांनी विचार करावा, असाही टोमणा त्यांनी लगावला. काहींना असं वाटतं की शिवसेना (Shiv Sena) संपली. मात्र, याच शिवसेनेला हरवण्यासाठी शिवसेनेतून आमदार फोडले, दिल्लीतून बढ्या नेत्यांना तुम्हाला बोलवावं लागलं. एवढंच नाही तर मनसेची देखील साथ तुम्हाला घ्यावी लागली. यावरून शिवसेना संपली नाही तर जिंकल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.