Shiv Sena leader MLA Bhaskar Jadhav esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhaskar Jadhav : राज्यात 8 महिन्यांत 9 ठिकाणी जातीय दंगली, या मागं भाजपचाच हात; आमदार जाधवांचा गंभीर आरोप

राज्यात गेल्या आठ महिन्यांत ९ ठिकाणी जातीय दंगली झाल्या.

सकाळ डिजिटल टीम

सध्या आरक्षणावरून मराठा समाजाचा उद्रेक झाला आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.

कोल्हापूर : ‘राज्यात गेल्या आठ महिन्यांत ९ ठिकाणी जातीय दंगली झाल्या. या मागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचे समोर आले आहे. राजकीय स्वार्थासाठी भाजपकडून (BJP) दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी डोके शांत ठेवून मतदान करावे. २०२४ ला केंद्रातून आणि राज्यातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करायचे आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.

मुस्लिम बोर्डिंग (Muslim Boarding) येथे झालेल्या ‘होऊ दे चर्चा’ या उपक्रमात ते बोलत होते. आमदार जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, ‘समाजात द्वेष निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहे. राज्यात गेल्या ८ महिन्यांत ९ दंगली झाल्या. दोन वर्षांपूर्वी माझ्या गुहागर मतदारसंघातही दंगल होणार असल्याचे भाकीत मी केले होते. त्यानंतर तेथे दंगल झाली.

त्या दंगलीमागे भाजप होता. २०२४ साली निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही हे भाजपला माहिती आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात भाजपकडून दंगली घडवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच सर्व धर्मीयांनी शांत राहून मतदान करून भाजपला सत्तेतून हद्दपार करावे.

सध्या आरक्षणावरून मराठा समाजाचा उद्रेक झाला आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. सत्ता द्या आरक्षण देतो, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचा उद्रेक झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजित पवार यांची अडचण

आमदार जाधव म्हणाले, ‘सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी अजित पवार भाजपसोबत गेले; पण आता त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थगिती देतात. ज्यावेळी अजित पवार आमच्यासोबत होते, त्यावेळी असे होत नव्हते. त्यामुळे अजित पवार यांची अडचण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT