Sanjay Raut vs Bhagat Singh Koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना नाना शंकरशेठ यांचं चरित्र पाठवणार : राऊत

गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? राज्यपाल कोश्यारी

सकाळ डिजिटल टीम

गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? राज्यपाल कोश्यारी

मुंबई : गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून (Mumbai) निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेनं या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केलीय.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, राज्यपालांकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. मुंबई मराठी माणसांची आणि कष्टकऱ्यांची आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटानं राज्यपालांचा साधा निषेध तरी करावं, असं आव्हान केलंय. मराठी, कष्टकरी जनतेवरील अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. राज्यपालांना मी नाना शंकरशेठ यांचं चरित्र पाठवणार असून त्यांनी ते वाचावं, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. त्यामुळं आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

'मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं विधानच राज्यपालांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 जणांनी आपलं हुतात्म देऊन मुंबई ही महाराष्ट्राला मिळवून दिली. मुंबईही मराठी माणसांचीच असं अभिमानाने सांगितलं जात मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानामुळं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT