Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ..तरीही शिवसेना सोडणार नाही; चौकशी सुरू असतानाच राऊतांचं ट्विट

संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडलीय.

सकाळ डिजिटल टीम

संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडलीय.

मुंबई : शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेते अशी ओळख असणाऱ्या संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडलीय. काहीवेळापूर्वीच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. त्यानंतर ईडीनं याठिकाणी तपासाला सुरुवात केलीय.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत ईडी कारवाईवर निशाणा साधलाय. राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, खोटी कारवाई.. खोटे पुरावे असं सांगत राऊतांनी मी शिवसेना सोडणार नाही. मरेन, पण शरण जाणार नाही, असा इशाराही त्यांनी ईडीला दिलाय. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असंही त्यांनी ईडीला सुनावलंय.

ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. त्यामुळं आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Neelam Gorhe : शिवसेना २५ जागांवर ठाम; वरिष्ठ स्तरावरून निर्णय होणार

Cold And Flu Myth: ओल्या केसांनी थंडीत बाहेर गेल्यास सर्दी होते का? वाचा डॉक्टरांचे मत

Pune Municipal Election : ‘मविआ’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; तिन्ही पक्षांना प्रत्येकी ५० जागा

Asif Ali Zardari: ‘आम्हाला बंकरमध्ये लपावं लागलं...’ ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या अध्यक्षांची कबुली; काय म्हणाले?

Pune Municipal Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेला हव्यात प्रत्येकी ३५ जागा

SCROLL FOR NEXT