Bhagat Singh Koshyari vs Sushma Andhare esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यापेक्षा भाजप सांभाळण्याची जबाबदारी कोश्यारींवर; अंधारेंची टीका

गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवलं, तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही : भगत सिंह कोश्यारी

सकाळ डिजिटल टीम

'गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवलं, तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही.'

महाराष्ट्रातून खास करुन मुंबई (Mumbai) आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवलं तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. तुम्ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणता; पण गुजराती (Gujarati) आणि राजस्थानी लोक नसतील तर मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, असं उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काढले आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोश्यारींच्या या वक्तव्याचा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

सुषमा अंधारेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, राज्यपाल हे राज्याचे पालक असतात अन् पालकानं राज्यप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ववानं राज्याचं संगोपन करणं, ही संविधानिक जबाबदारी आहे. परंतु, महामहीम कोश्यारी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण, राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे, अशी त्यांनी राज्यपालांवर टीका केलीय. चला, मुंबईसह अखंड महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, जपण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया, असंही अंधारेंनी जनतेला आवाहन केलंय.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होतं. पण, आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येही इनकमिंग सुरु झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारेंनी शिवबंधन बांधलंय.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. या आधीही राज्यपालांच्या विधानावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. राज्यपालांनी क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्याबाबत काढलेले उद्गारही असेच वादग्रस्त ठरले होते. राज्यपालांनी काढलेल्या उद्गारावरुनही आता वाद निर्माण होण्याची अधिक चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT