महाराष्ट्र

शिवसेनेत लवकरच खांदेपालट? 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्य सरकारमध्ये सहभागी होताना विधान परिषदेतील चार सदस्यांना कॅबिनेट मंत्री केल्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचा असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसांतच किमान तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना नारळ देण्याची चर्चा शिवसेनेत सुरू आहे. 

राज्याच्या सत्तेत सहभागी होताना शिवसेनेच्या विधान परिषदेतील सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली. वास्तविक पाहता युती तुटल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते. यांच्यामधून अनेकांना मंत्रिपद मिळेल अशी शक्‍यता असताना शिवसेनेतील जुने नेते आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या चौघांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला; मात्र त्यामुळे निर्माण झालेला असंतोष आता उफाळून आला आहे. याबाबत शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या असून, उद्या (ता. 6) मातोश्रीवर यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. 

विधान परिषद सदस्य असलेल्या आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या काही जणांना वगळण्यात येणार असून, विधान परिषदेतील फक्त एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असेल. मुंबई महापालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदाराची राज्यमंत्रिपदावर वर्णी लागेल. सध्याचे दोन विद्यमान राज्यमंत्री वगळण्यात येणार असून, मुंबईतील महापालिका सांभाळलेल्या एका नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश होईल. विद्यमान जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आणि संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात येईल, असे सांगण्यात येते. 

कोल्हापूरला प्रतिनिधित्व? 
रत्नागिरी जिल्ह्यातील राजन साळवी किंवा सदानंद चव्हाण यांची राज्यमंत्रिपदावर वर्णी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार असल्याने कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळेल. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद कायम राखण्यासाठी अर्जुन खोतकर मंत्रिमंडळात असले तरी त्यांच्या जोडीला नांदेड जिल्ह्यातील आमदाराला कॅबिनेट मंत्री करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT