shiv sena mla disqualification case result Esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंना पहिला धक्का! शिंदेंची गटनेते पदावरून केलेली हकालपट्टी विधानसभा अध्यक्षांनी नाकारली

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसाभ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. गेल्या दिड वर्षापासून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. आज सभागृहात दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित होते.

Sandip Kapde

shiv sena mla disqualification case result: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसाभ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. गेल्या दिड वर्षापासून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. आज सभागृहात दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे आणि दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले.

यावेळी नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे नार्वेकर म्हणाले.

पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतीम असेल. पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतीम असेल. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचा सपोर्ट नव्हता. पक्षप्रमुपख एकटेच निर्यण घेऊ शकत नाहीत. तसेच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करता येत नाही.

नार्वेकर म्हणाले, खरी शिवसेना कुणाची आणि व्हीप कुणाचा हा महत्वाचा मुद्दा माझ्यासमोर होता. घटना, नेत्व आणि विधिमंडळ बहुमत, हे तीन घटक पक्ष ठरवताना महत्वाचे आहेत. खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा माझ्यासमोर होता. राजकीय पक्ष मी प्रथमदर्शनी ठरवताना शिवसेनेच्या घटनेचा देखील विचार झाला. निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षाची घटना लक्षात घेता. निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये शिंदे गट ही खरी शिवसेना आहे.

दोन्ही पक्षांनी (शिवसेनेचे दोन गट) निवडणूक आयोगाला सादर केलेल्या घटनेवर एकमत नाही. नेतृत्व रचनेबाबत दोन्ही पक्षांची मते भिन्न आहेत. एकमेव पैलू म्हणजे विधिमंडळ पक्षात बहुमत. वादाच्या आधी अस्तित्वात असलेल्या नेतृत्व रचनेचा विचार करून संबंधित घटना मला ठरवावी लागेल."

निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे आहे. निवडणूक आयोगाच निकाल, पक्षाची घटना याचा आधार निकाल देतान केला आहे. 2018 मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना 1999 सालची ग्राह्य धरणार आहे.", असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT