sanjay shirsat 
महाराष्ट्र बातम्या

वेळ लागला तरी चालेल, पण अन्याय व्हायला नको, अध्यक्ष लवकरच शेड्यूल जाहीर करणार; संजय शिरसाट यांची माहिती

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या 22 याचिका तर शिंदे गटाच्या 12 याचिका त्यांच्यासमोर आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १३ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद नार्वेकरांनी ऐकला. अध्यक्षांनी आपला निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती, संजय शिरसाट यांनी दिली आहे.

पुढे शेड्यूल्ड प्रमाणे सुनावणी घेतली जाईल अशी माहिती शिरसाट यांनी दिली. वेगवेगळ्या सुनावणी करण्यास ठाकरे गटाचा विरोध होता. पण, नार्वेकरांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच सुनावणी होईल. पुढे सुनावणी कशी घ्यायची यावर आज विचार झाला, असं ते म्हणाले.

दोन तीन दिवसात अध्यक्ष याप्रकरणात आँर्डर काढतील. १३ तारखेला एकत्र सुनावणी घ्यायची की नाही ते ठरवलं जाईल. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला. अध्यक्षांनी आपला निर्णय राखून ठेवलाय, असं शिरसाठ म्हणाले. तसेच लाईव्ह सुनावणी घेण्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचं ते म्हणाले.

दोन्ही गटांना आणखी माहिती द्यायची आहे. पण, पुढील सुनावणी कशी घ्यायची यासाठी एक शेड्यूल तयार करणार असल्याचं अध्यक्ष म्हणाले आहेत. त्यानुसार ते लवकरच शेड्यूल जाहीर करतील, असं शिरसाट म्हणाले. प्रत्येक प्रकरणाची सुनावणी व्हायला हवी, कोणावर अन्याय होऊ नये. यासाठी वेळ लागला तरी चालेल, अशी अध्यक्षांची भूमिका आहे. त्यामुळे याप्रकरणावर निर्णय व्हायला चार ते पाच महिने वेळ लागणार असल्याचं बोललं जातं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT