Shiv Sena MLA Pratap Sarnaik cheated of Rs 7 crore 66 lakh marathi Crime News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena News : शिंदे गटाच्या आमदाराची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

रोहित कणसे

Pratap Sarnaik Cheated of Rs 7 crore 66 lakh : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना घोडबंदर येथील एका जमीनीच्या व्यवहारात ही फसवणूक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तील संपर्क केला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले.मात्र त्या व्यक्तीन जमीन नावावर केली नाहीच, सोबतच पैसे देखील परत केले नाहीत अशी माहिती मिळत आहे. टीव्ही९ या वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

२०२१ पासून या व्यवहारासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत. संबंधीत आरोपीने टाळाटाळ केली. यानंतर सरनाईक यांनी अखेर त्यांच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार दिली, आता या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर फसवणूक संबंधीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT