latest political news  esakal
महाराष्ट्र बातम्या

'पवार कुटूंबाची मोठी परंपरा, जान ठेवून राजकारण करा'

महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी बऱ्याचवेळा समोर येत असते.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी बऱ्याचवेळा समोर येत असते.

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार तयार राजकीय वर्तुळातून पहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींनी वेग घेतला आहे. नेतेमंडळींच्या गाठीभेटी वाढल्या असल्याने निवडणुकीला रंगत चढली आहे. दरम्यान, असे असले तरीही महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी बऱ्याचवेळा समोर येत असते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील नेते आपल्या मित्रपक्षांवर टीका करताना दिसून येतात. (latest political news)

अहमदनगर जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर येत आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधत इशाराही दिला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत, असं इशारा खासदार गजानन किर्तिकर यांनी दिला आहे.

यावेळी खासदार कीर्तिकर म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा असून त्याची जान राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांवर दबाव आणणे बंद करावे, असंही त्यांनी सुनावलं आहे. अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी खासदार कीर्तिकर हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यानिमित्त ते कर्जत येथे बोलत होते.

पुढे ते म्हणाले, आमदार पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशाराच शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Bonus: दिवाळीआधीच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्र सरकारकडून बोनस जाहीर, पण किती?

Sinnar Water Supply : ऐन दिवाळीत सिन्नर पाण्याविना! पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त

Chhagan Bhujbal: आधी नाराजी मग राजी! बीडच्या ओबीसी मेळाव्याला लक्ष्मण हाके जाणार, नेमकं काय ठरलं?

Rawdogging Flights: ना पुस्तक, ना संगीत, ना मुव्ही... काय आहे Raw-Dogging फ्लाइट ट्रेंड? लांबच्या प्रवासाच्या फ्लाइटमध्ये हळू हळू फॉलो होतोय

Chimthane Accident : खलाणेत गौण खनिजाचा डंपर बसस्थानकात शिरला; दोन महिला जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT