Eknath Shindes question to Chief Minister Uddhav Thackeray Eknath Shindes question to Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंनी दुसरं बंड थोपवलं ? शिवसेनेसोबतच्या खासदारांची संख्या वाढली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. तब्बल 40 आमदार गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. मात्र शिवसेनेसोबत 19 पैकी 17 खासदार असल्याचं सांगण्यात समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. (Shivsena MP news in Marathi)

मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला पाच खासदारांनी दांडी मारली होती. यापैकी संजय जाधव वारीला गेलेले होते. ते आजारी आहेत. त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर संजय मंडलिक यांना दिल्लीला जावं लागलं. त्यांनी परवानगी घेतली होती. तसेच खासदार कलाबेन डेलकर पावसामुळे येऊ शकल्या नाहीत. तर खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे आले नाहीत. त्यामुळे शिवसेनेसोबत 19 पैकी 17 खासदार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव टाकरे यांनी खासदारांचं बंड थोपवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली. शिवसेनेच्या बहुतांशी खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात मत व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT