महाराष्ट्र बातम्या

आम्ही राष्ट्रवादीला बुडवू, शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

परभणीच्या जिल्हाधिकारी अंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद समोर आला आहे. माकडीनही गरज पडली की पिल्लाला बुडवते, आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. आमचं तेवढं उघडं करतात, आता पाणी वर जाऊ लागले आहे, असा संताप जाधव यांनी व्यक्त केला. जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. संजय जाधव यांच्या या आक्रमक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शेवटी आम्ही आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलोय. जिल्ह्यामध्ये कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीने एवढं रानं केलं की, जसं काही मोठा अपराध केला होता. तुम्हाला सगळं जमलंय. म्हणजे, आपलं घ्यायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था या राष्ट्रवादी वाल्याची झाली आहे, असा हल्लाबोल करत संजय जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, इतके होऊनही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्हाला मान्य आहे. जो काही आदेश आला तो स्वीकाराला आहे. पण प्रत्येक गोष्टीत खाजवा-खाजवी चालू आहे, ही वस्तूस्थिती तुम्हाला सांगतोय, असे संजय जाधव म्हणाले.

शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचं. कुठपर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीन सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घालते. तेव्हा राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू, हे लक्षात ठेवा, असे संजय जाधव म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

आयएएस अधिकारी आंचल गोयल (aanchal goyal) यांच्या नियुक्तीवरून परभणी जिल्ह्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. गोयल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या रुजू होण्याच्या अगोदरच त्यांची बदली रद्द करण्यात आली होती. त्यामुळे परभणीत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलनही केलं होतं. जिल्हाधिकारी बदलीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वाद समोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT