Eknath Shinde Fadanvis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vaibhav Naik : शिंदे-फडणवीसांचा बाजार जनताच उठवणार; ठाकरे गटाच्या आमदाराचा थेट इशारा

काल सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारवर स्थापनेवरून ताशेरे ओढले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेसोबत (Shiv Sena) गद्दारी करून राज्‍य सरकार स्थापन केलेल्‍या लोकप्रतिनिधींना कधी ना कधी जनतेच्या दरबारात जावेच लागणार आहे.

कणकवली : नीतिमत्ता गुंडाळून राज्‍यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) बाजार आता राज्‍यातील जनताच उठवेल, असा विश्‍वास आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आज व्यक्‍त केला. मुख्यमंत्री शिंदेंकडे नीतिमत्ता नसल्‍याने ते राजीनामा देणार नाहीत. पण नीतिमत्तेला धरून हे सरकार स्थापन झालेलं नाही हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले असल्‍याचे ते म्‍हणाले.

राज्‍यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काल निर्णय दिला. यावर आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्‍हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्‍यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्‍यानंतर त्‍यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला. काल सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारवर स्थापनेवरून ताशेरे ओढले आहेत. चुकीच्या पद्धतीनं सरकार स्थापन झाल्‍याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्‍हटलं आहे. त्‍यामुळे नीतिमत्तेला धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. पण शिंदेकडे नीतिमत्ता नसल्‍याने ते राजीनामा देणार नाहीत.

नाईक म्‍हणाले, शिवसेनेसोबत (Shiv Sena) गद्दारी करून राज्‍य सरकार स्थापन केलेल्‍या लोकप्रतिनिधींना कधी ना कधी जनतेच्या दरबारात जावेच लागणार आहे. त्‍यावेळी जनता यांना कधीच माफ करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्‍यपालांची भूमिका कशी चुकीची होती. केंद्राने त्‍यांच्यावर कसा दबाव आणला हे निकालपत्रात नमूद केलं आहे. त्‍यामुळे शिंदे-फडणवीस यांच्याकडे नितिमत्ता राहिलेली नाही हेच स्पष्‍ट होत आहे. तसेच तुम्‍ही कितीही कांगावा केलात तरी जनता तुमचा बाजार उठविल्‍याखेरीज राहणार नाही असेही श्री. नाईक म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT