sanjay raut  sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

गद्दारांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकविला : संजय राऊत

संजय राऊत यांची बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबईत शिवसेना (Shivsena) आहे, तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कुणालाही तोडता येणार नाही. भाजपला महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे. मुंबई वाचविण्यासाठी महाराष्ट्राने १०५ हुतात्मे दिले; पण महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही. हा इतिहास आहे. आता ज्यांनी शिवसेना तोडली, त्या दिल्लीश्वरांना मुजरा करण्यासाठी बंडखोर गेले आहेत. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, की शिवसेना अंगार आहे, अंगार पेटत नाही. पण पेटलाच तर विझतही नाही. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांच्या सगळ्या जुलाबरावांच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र केवळ आदेशाची वाट पाहत आहे, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी (ता. ९) येथे दिला. (Latest marathi news)


शिवसेना आमच्याच बापाची
नाशिकची शिवसेना जागेवरच आहे, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य जागेवरच आहे. मालेगाव-नांदगाववाल्यांसह जुलाबरावांनी पाहून घ्यावे, अशी सुरवात करीत श्री. राऊत म्हणाले, की ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही, १०० आमदार, २५ खासदार निवडून आणायची क्षमता आमच्यात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. शिवसेनेशी गद्दारी सोपी नाही, शिवसेना ज्यांनी जन्माला घातली ते शिवसेनाप्रमुख आमचा बाप आहे. ही लढाई फक्त असली-नकली शिवसेनेची नसून ‘सच्चाई विरुद्ध बेइमानी’ यांच्यातील आहे. शिवसेना सोडल्याची प्रत्येक जण वेगवेगळी कारण देत आहे. हिंमत असेल तर उघडपणे सांगा, की आम्ही शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र कोरोनाने आजारी असताना खोकेबाजांनी घात केला.

खोकेबाजीला ठोकेबाजीने उत्तर
खासदार राऊत म्‍हणाले, की साधा आमदार होण्याची लायकी नसलेल्या अनेकांना ‘शिवसेना’ या नावामुळे मानसन्मान प्रतिष्ठा मिळाली. हजारो शिवसैनिकांनी घाम गाळून ज्यांना मंत्री केले, ते खोकेबाजीसाठी गद्दार झाले. शिवसेनेतून का फुटले, याचे प्रत्येक जण वेगवेगळी कारणे सांगत आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यामुळे जळगावात शिवसेना वाढू शकली नसल्याचा आरोप केला. आधी एकत्र बसा, का फुटलो याचे एक कारण तर ठरवा, असे टोला लगावत फुटून गेलेल्यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावेच, असे आव्हान त्यांनी दिले. तत्पूर्वी गायकवाड, घोलप, बागूल, बडगुजर आदींची भाषणे झाली. या वेळी भाजपचे महेंद्र आव्हाड, अश्रफ सय्यद आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिक-पुणे महामार्गावरील इच्छामणी लॉन्स येथे शनिवारी (ता.९) शिवसेनेतील बंडानंतरचा शक्तिप्रदर्शन मेळावा झाला. उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, अल्ताफ खान, भाऊ तांबडे, महागरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदींसह विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात बंडखोरांच्या नावाने घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी लाखोली वाहिली. त्यामुळे शक्तिप्रदर्शनाच्या अंगाने मेळाव्याला गर्दी जमवत बंडखोरांना इशारा देण्यात जिल्हा व शहर शिवसेनेला यश आले.

शक्तिप्रदर्शनाच्या अंगाने आजच्या शिवसेना मेळाव्याला निवृत्त प्रेस कामगार जयंत गाडेकर, काका पवार आदी जुन्या पिढीतील ज्येष्ठांपासून नाशिक रोड विभागप्रमुख नितीन चिडे, योगेश देशमुख, किरण डहाळे, स्वप्नील औटे, योगेश गाडेकर, वैभव ठाकरे, विक्रांत थोरात आदींपासून तर नवोदित कार्यकर्त्यांपर्यत महिलांची गर्दी मोठी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

SCROLL FOR NEXT