Former MP Shivajirao Adhalrao Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

हकालपट्टीच्या खोट्या बातमीनंतर ठाकरेंचा आढळरावांना फोन; म्हणाले...

आज सामना या वृत्तपत्रात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीची बातमी प्रसिद्ध झाली होती.

दत्ता लवांडे

मुंबई : आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यातून शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आणि राज्याच एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी अनावधानाने छापली असल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या या कारणावरून त्यांना काढून टाकल्याची माहिती होती. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती.

(CM Uddhav Thackeray Phone Call to Shivajirao Adhalrao Patil)

या सर्व प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना फोन करून झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली आहे पण राज्यभर माझी बदनामी झाली त्याचं काय?" अशी प्रतिक्रिया आढळराव यांनी दिली आहे. दरम्यान आज दिवसभर मी विचार करणार आहे. झाल्या प्रकाराबद्दल उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय ठरवला जाईल अशा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

हकालपट्टीच्या बातमीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मी कित्येक वर्षे राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूद्ध लढलो. गेल्या अडीच वर्षापासून मी त्यांना अंगावर घेत आलोय आता फक्त गोळ्या मारायच्याच बाकी आहेत. शरद पवारांनी मला लोकसभा न लढण्यासाठी ऑफर दिली होती पण मी बाळासाहेबांच्या विचारावर ठाम राहिलो. आणि आज माझी काही चुकी नसताना काही कारण नसताना मला पक्षातून काढून टाकण्यात आलंय. यासाठी काहीतरी कारण तरी द्यायचं. अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती पण या प्रकारानंतर शिवसेनेने पत्रक काढून खुलासा करत ही बातमी अनावधानाने छापली असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांनी फोन करून हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: “निवडणूक लढवता? मग हे लिहून द्याल का?” संकल्पनामा फेल झाला तर राजकारणालाही ब्रेक!

Malegaon News : तुकाराम मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली; मान्यता रद्द असूनही मालेगावात अंधशाळा सुरूच

Union Budget 2026 : १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहणार का?

मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

'अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही'; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT