Shivajirao Naik Esakal
महाराष्ट्र बातम्या

माजी राज्यमंत्र्यांसह 48 हजार समर्थक, कार्यकर्ते करणार राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार यांच्या उपस्थितीत २ एप्रिलला होणार राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

सांगली: शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) आपल्या सर्व कार्यकर्त्या समवेत शनिवारी २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा (Shirala) येथे राष्ट्रवादीत (NCP) पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली. येथील यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील, ओ.बी.सी सेलचे सांगली जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद गुरव, शिराळा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सागर नाईक, सांगली जिल्हा युवा मोर्चा उपाअध्यक्ष पांडुरंग गायकवाड, वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष सी.एच. पाटील यांच्यासह १४ सेल व १३ आघाड्याच्या सर्व पदाधिकारी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये ३३४ बूथ केंद्र, ८४ शक्ती बूथ केंद्राच्या सर्व पदाधिकारी व शिराळा तालुक्यातील २७ सरपंच २१९ ग्रामपंचायत सदस्य व वाळवा तालुक्यातील १७ सरपंच व १३७ ग्रामपंचायत सदस्य यांनी ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.

यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, सागर नाईक,उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड,विजय महाडिक,शरद गुरव, उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT