Shivaji maharaj Forts
Shivaji maharaj Forts esakal
महाराष्ट्र

राज्यभरातील 350 किल्ल्यांवर होणार शिवराज्याभिषेक सोहळा

हेमंत पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत.

कऱ्हाड (सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधत सह्याद्री प्रतिष्ठान (Sahyadri Pratishthan) हिंदुस्थानकडून 350 किल्ल्यांवर शिवराज्याभिषेक सोहळा करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवक मेळाव्यात करण्यात आला. त्याचबरोबर किल्ले तुंग, संग्राम दुर्ग यासह राज्यभरातील किल्ल्यांवरील संवर्धन कार्य, स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या शिलेदारांच्या समाधीस्थळांच्या जीर्णोद्धाराची चर्चा मेळाव्यात झाली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच चाकणला मेळावा झाला. नगर, नाशिक, बीड, नांदेड, जळगाव, चाळीसगाव, मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर, अलिबाग, कर्जत, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह राज्यातील कानाकोपर्‍यातून सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक या मेळाव्यात सहभागी झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार संजय केळकर यांनी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरच्या दुर्गसेवकांनी तयार केलेली चित्रफीत दूरचित्र वाहिन्यांवर दाखवली जावी, असे मत व्यक्त केले. गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना अधिकार द्यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांनी केली.

राज्य पुरातत्व खात्याचे उपसंचालक विलास वहाने यांनी संग्रामदुर्ग किल्ला आहे, तसा उभा करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्य पुरातत्व खाते प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यातील 45 हजार गावात वीरगळ, ऐतिहासिक स्मारके आहेत. मात्र, 700 ते 800 स्मारके वगळता अन्य स्मारकांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठीच राज्य पुरातत्व खाते एक स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचा विचार करत आहे. सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी गडकोटांवर संवर्धनाचे काम करताना या अ‍ॅपवर दुर्लक्षित स्मारकांचे फोटो अपलोड केल्यास स्मारक जतन व संवर्धन करण्यासाठी कराव्या लागणार्‍या आवश्यक उपाययोजनांवर विचार करणे सहजशक्य होईल, असे आवाहन त्यांनी केले. श्री गोजमगुंडे यांनी शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत तिथीनुसार जून 2022 ला राज्याभिषेक सोहळा होणार असल्याचेही जाहीर केले. निलेश जेधे, अजय झा, मनोज बागुल, दीपक प्रभावळकर, चैतन्य महाराज यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT